Sunday, August 22, 2010

राग का येतो..?

दैनंदिन जीवनात अचानक समोर आलेल्या ताणाचा सामना करताना चिडचिड होते. पण, अशा वेळी शांत राहून परिस्थिती हाताळावी 
लागते.
 
स्ट्रेस हाताळून 'कूल' कसं रहायचं, याच्या एक्स्पर्ट्स टिप्स जाणून घेतल्या आहेत, विनय उपासनी यांनी

....
राग का येतो..? 
याची कारणं स्थल-काल आणि व्यक्तिपरत्वे विभिन्न असू शकतात. त्यामुळे राग का येतो, याची ठोस कारणं देता येत नाहीत. तरीही, ढोबळ मानाने ऑफिसात किंवा घरात मनाविरूद्ध एखादी घटना घडली किंवा कामाचा अतिताण जाणवला की चीडचीड होते.

हे सर्व टाळायचं कसे..?

* आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असताना आपण त्यात उत्तम प्रकारे स्थिर झालो आहोत की नाही हे तपासा

* ऑफिसच्या वेळा ठरलेल्या असल्यास त्यानुसार तुमच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची आखणी करा

* सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार, योगासनं किंवा तत्सम व्यायाम

अवश्य करा

* रोज ब्रेकफास्ट घ्यायला हवा

* भरपूर पाणी प्या

* मोबाइल, लॅपटॉप किंवा चार्जर्स आदी वस्तू

अप टू डेट ठेवा

* डायरी मेण्टेन करा

* आपल्या कामाच्या पद्धतीला साजेसे कपडे करा

ताणतणाव जाणवल्यास काय..?

* त्वरित रिअॅक्ट होऊ नका

* प्राप्त परिस्थितीचा शक्यतो शांत राहून विचार करा

* मेडिटेशन करता येईल

* कामातून काही वेळ बाजूला काढून शांत बसा

* मन शांत झाल्यावर पुन्हा कामाकडे वळा

* बसल्या जागी योगासनांचे काही प्रकारही करता येऊ शकतात

- डॉ. रवींद्र कुलकर्णी

.......

स्टॉप मेथड

ताणतणाव जाणवल्यास 'स्टॉप मेथड'चा अवलंब करावा :

* एस - स्टॉप, टी - टाइम आऊट, ओ - ऑर्ब्झव्ह, पी - प्रीर्झव्ह

* ताण जाणवल्यास तुम्ही करत असलेले कोणतेही काम त्वरित थांबवा

* स्वत:ला थोडा वेळ द्या

* आत्मपरीक्षण करून तणावाची कारणं शोधा

* आपण बरोबर की चूक आहोत हे तपासा

* खोल श्वास आत घ्या आणि हळूवार सोडा. यामुळे तुमचा तणाव हलका होण्यास मदत होईल

* त्यानंतर तणावापूर्वीच्या स्थितीत जा

* सकारात्मक विचार करा

* दिवसअखेरीस स्वत:च्या कामाचा आढावा घ्या

* मनातील विचार डायरीत लिहा

* कुटुंबीय, जवळच्या मित्रांशी संवाद साधा

* योगासनं करा

* एखाद्या निसर्गरम्य स्थळाला भेट द्या

 


आत्मबल वाढवा...

वाढत्या स्पर्धेमुळे शारीरिक ताणांपेक्षा मानसिक ताण अधिक जाणवतात. त्यातून नकारात्मक विचार वाढीस लागतात. व्यसनाधीनता वाढते. हे सर्व टाळण्यासाठी तसंच ताणतणावांचा यशस्वी सामना करण्यासाठी स्वत:तील अंतर्गत शक्तीचा विकास होईल याकडे लक्ष द्या.
 

* नियमित व्यायाम करा

* रोज योग-प्राणायाम केल्यास उत्तम

* त्यामुळे आपल्या मेंदूतील रसायनांची पातळी समान राहते

* जवळच्या व्यक्तींकडे मन मोकळं करा

* ताणतणावांचा सामना करताना व्यसनाधीन होऊ नका

* मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधा

* वीकेण्डला कुटुंबियांबरोबर मनसोक्त एन्जॉय करा

* ऑफिसात तणाव जाणवल्यास थोडा वेळ काढा

* मोबाइलवर गेम्स खेळा, संगीत ऐका

* सुट्टीच्या दिवशी आऊटिंगला जा. आवडीचा सिनेमा पहा

* ट्रेकिंगला गेल्यास मनोबल वाढण्यास मदत होते

* घरात तणाव असल्यास संवाद साधण्याचा प्रयत्न करा

* मोठ्यांशी चर्चा करा

* परस्परांना समजून घ्या

* एकंदर काय, कूल रहा

* तणावाचा जास्त बाऊ करू नका 

No comments: