Wednesday, July 1, 2009

प्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..

प्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..
प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा..
बघू नए इतका नकोसा होतो..
मग...
रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते..
रुसलेल्या तिची समजूत काढण तेव्हा गरजेच नसते..
तिच्या मिठीच्या नशेपेक्षा आता रम जवळची वाटते..
घरापेक्षा ऑफिस ची केबिन जास्त शांत वाटते..
झक मारली नी प्रेम केले असच कायम वाटत राहते..
कारण...
जीव टाकणाऱ्या प्रेयसीची..
आता कज्जाग बायको झालेली असते...

No comments: