Friday, July 3, 2009

रूप तुझे..........

रूप तुझे नक्षत्रापरी भासे गं सोनेरी
लावण्याने तुझ्या भूलवत रहा अशीच !

दिवस रात्र आता पाहतो तुझीच स्वप्नं
स्वप्नांच्या हिंदोळ्यात झुलवत रहा अशीच !

गुलाबी पाकळ्यांतूनी चमकती जणू मोती
लाजत मुरडत गालात हसत रहा अशीच !

विसरूनी जग सारे, हरवलो तुझ्या डोळयात
तूही मिसळूनी डोळे पहात रहा अशीच !

नको दुरावा एका क्षणाचाही सखये ....
सहवास करी धुंद तुझा .. जवळ रहा अशीच !

मिठीत तुझ्या येई अनुभव स्वर्गसुखाचा
चांदण्या रात्री आज या बिलगून रहा अशीच !!

No comments: