Wednesday, July 15, 2009

असाव कुणीतरी.....
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी....

असाव कुणीतरी.....
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी.....

असाव कुणीतरी......
मी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी.....

असाव कुणीतरी.....
माजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारं,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी.....

असाव कुणीतरी.....
भरलेच जर डोळे कधी माजे,
तर ओल्या असवांना पुसनारी.....

असाव कुणीतरी.....
माज्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी.....

असाव कुणीतरी.....
पलिकडील किना-यावरून माजी वाट पाहणारी,
उशीर जाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ......

असाव कुणीतरी.....
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी.....

No comments: