पहिल्या पावसाच्या प्रत्येक सरित जेव्हा उलगडून येतात आठवणी... शब्दांचाही पाऊस लगेच पडू लागतो अन् गारठून येतात सगळे भाव मनी... पहिला पावूस नेहमी काहीसा कोरडाच जातो कुणास ठाऊक मृदुगंध का दरवळत नाही?... पावसात गरजनारी वीजेची चमक प्रकाशुन का जाते मनातले कानोसे काही?... सर्वांगात मग माझ्या एकच कळ अशी उठते, मी पुन्हा एकटाच कुण्या विचारत भिजत..आणि .. शब्दांचाही पाऊस लगेच पडू लागतो अन् गारठून येतात सगळे भाव मनी... आठवतो तुझी ती सोबत, तुझी ती इच्छा... पहिल्या पावसात जावून यथेच्छ भिजण्याची.... हात फैलवुन चेहऱ्यावर कोसलनार्या सरिंना गोल-गोल फिरून तू जशी जीवंत जेव्हा जगायची.... सरिपलिकडला गारवा मात्र न भीजता आता उठ्वुनी देते डोक्यात ती नकोशी झनझनी शब्दांचाही पाऊस लगेच पडू लागतो अन् गारठून येतात सगळे भाव मनी... सगळे विश्व आपले भविष्याताले आपण अश्याच पावसात होते रंगविले... तुझ्या हातात हात अन् त्यावर पडणार्या सरिंसवे आपण प्रत्येक स्वप्नाला होते जगविले .. सर्व स्वप्नांचे घर असे गळ लागतील वाटते, का नव्हता आला हा विचार कधी ध्यानी? अन् शब्दांचाही पाऊस लगेच पडू लागतो गारठून येतात सगळे भाव मनी... असू दे सर्व जून माझ्याच सोबतीला तू, अन् पडू देत अश्याच सर्व या धरा ... नियतीला कदाचित मान्य असेन माझ्यासाठी, असाच पेट्नारा "ओला" वणवा सारा पण जगताना या पावसात, 'छन्नी' करून सोडते जेव्हा या बरसनार्या 'बाणा' सवे सर्व सरी... शब्दांचाही पाऊस लगेच पडू लागतो अन् गारठून येतात सगळे भाव मनी... दूर तुझ्या देशी बरसनारा पाऊस, कदाचित अस्साच तुलाही छळत असेन म्हणुनच वाटते मला हे काले-ढग "अघोरी " जे तुलाही माझ्याप्रमाने सुखाने जगु देत नसेन याच सरिंमधे मिलाल्यावर दिसत नाही जेव्हा पावसात वाहणारे आपले नयन-पाणी शब्दांचाही पाऊस लगेच पडू लागतो अन् गारठून येतात सगले भाव मनी... ----" दूर झालेल्या दोन मनांसाठी"----
No comments:
Post a Comment