Monday, February 28, 2011

कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत..

कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...
कशाला म्हणतात प्रेम...

कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत...
दिवसरात्र त्याचा विचार करण हे प्रेम असत..
येणार नाही माहित असुनही त्याच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत...
की तो नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत....

ऑरकुट वर सारख त्याच्या प्रोफाइल ला visit करण...
त्याचा no डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करण याला प्रेम म्हणतात
मी बोलणारच नाही त्याच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करण याला प्रेम म्हणतात
की त्याला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
त्याच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात

त्याच्या एक नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात...
त्याच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात...
त्याच्यासाठी वाटनार्या काळजिला प्रेम म्हणतात की
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात...

त्याच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
त्याच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात...
स्वताच्याही नकळत त्याच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात की
तो सोडून गेल्यावरही चातकासारखी त्याची वाट पाहन याला प्रेम म्हणतात...

No comments: