Thursday, September 30, 2010

शाळेची आठवण...

शाळेची आठवण...
आठवतात ते दिवस,
वर्गात जाण्यासाठि धावायचो,
पहिला बॆंच पकडण्यासाठि,
अनेकदा धडपडायचो.

आठवते मला दप्तरातली,
पेन्सिल आणि दुहेरी रेघांची वही,
घ्यायला लागायची ग्रुहपाठावर,
नियमित आई बाबांची सहि.

रोज सकाळि प्रार्थनेला,
वेळेवर हजर राहणे,
मधल्या सुट्टित डबा खाऊन,
धावत मैदानावर जाणे.

हस्तकलेच्या तासाला,
काहितरी उपद्व्याप करणे,
अन वर्गासमोर शिक्षकांचा,
पाठित धपाटा खाणे.

खेळाच्या तासाला जाताना,
एका रांगेतुन चालणे,
अन परत येत असताना,
मित्रांच्या खोड्या काढणे.

सहामाहि परिक्षेनंतर येणा-या
दिवाळिच्या सुट्टिची मजा
आणि त्या सुट्टित बाईंनी दिलेल्या
दिवाळिच्या अभ्यासाची सजा.

वार्षिक परिक्षेच्या वेळि,
येणा-या उन्हाळि सुट्टिची तयारी,
अन निकाल लागल्यानंतर,
बाहेर पडायची आमची हुशारी.

परत नवीन वर्गात जाण्यासाठि,
मनं उत्साहि व्हायचं,
अन पहिला बॆंच पकडण्यासाठि,
पुनपुनधडपडायचं......

आई तुझी आठवण येते;

आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते 
वात्स्ल्याचा कुठें उमाळातव हातांचा नसे जिव्हाळा 
हृदयांचे मम होऊन पाणीनयनीं दाटून येते
आई तुझ्याविण जगीं एकटापोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूंकाळीज तिळतिळ तुटतें
हांक मारितो आई आईचुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउलीका नच कानीं येते
सुकल्या नयनीं नुरले पाणीसुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचेंजागीं तडफड करतें
नको जीव हा नकोच जगणेंआईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळींपुसुनी लोचनें मातें

आई फ़क्त तुझ्यासाठी.......

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मनअडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
airport वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...
इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतरतोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....
थकलेलं माझं शरीरलगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्रतुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...
अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....
सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोईमागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी....

ती आई होती म्हणूनी


तुलाच ध्यावे , तुलाच गावे , तुला पूजावे आई !

"तुलाच ध्यावे तुलाच गावे तुला पूजावे आई !
जगत अवघ्या तुझासरखे दुसरे दैवत नाही ! "

"
चंद्राचे चांदणे तर नित्य बदलत असते 
परंतु,
आईच्या वात्सल्याची अमावस्या कधीच होत नसते !
नदीच्या पात्रतले पाणीही नेहमी वाढत - घटत राहते,
परंतु,
आईच्या प्रेमाचा प्रवाह 
कधीही घटत नाही आटत नाही !"