Friday, July 2, 2010

मला सोडताना तू दिलेली लाली तशीच माझ्या ओठी... अजूनही!

मला सोडताना तू दिलेली लाली तशीच माझ्या ओठी... अजूनही!
तुझ्याच मिठीची ऊब झगडतेय या थंडी पावसाशी... अजूनही!

तू दिलेल्या मोगर्‍याच्या कळ्या ओंजळीत ठेऊन मी अजून भिजतोय
तुझीच ओढणी लपेटून मी अजून तिथंच बसलोय

माझ्या श्वासात तुझाच उष्ण श्वास आहे... अजूनही!
रंध्रारंध्रातून तुझीच आस, पावलोपावली तुझाच भास... अजूनही!

माझा रस्ताच थांबलाय त्या वळणावर, अन बुध्दी थिजलिये
ठोकाच चुकलाय त्या समेवर, पण मन वेडं गातंय तुझीच गाणी

मला माझं नाव आठवत नाही, मला माझं गाव आठवत नाही
अजूनही! आठवतंय ती, फक्त तू! ... फक्त तूच!

No comments: