कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
“प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली.”
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
“थांब गाडी लावुन येतो!” म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली
शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली “सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली..”
No comments:
Post a Comment