Wednesday, June 30, 2010

एक थेंब असा निथळला,

एक थेंब असा निथळला,
केसातुन गाली ओघळला
तुझ्या केसांच्या आठवणीने
शहारा फुलवून गेला

एक थेंब जरा चुकार
माझ्या कानी शिरला
काही नवे, अनवटसे
कुजबुजून गेला

एक थेंब उगा हिरमुसला
मी अलगद तळ-हाती धरला
तुझ्या भेटीगत आला
नकळत विरुन गेला

एक थेंब असा बरसला
सर्वांग भिजवुनी उरला
अनोळखी, अलवार काही
मनात रुजवूनी गेला

No comments: