Tuesday, June 29, 2010

आता वाटतं सुटावेत अलगद नकळत हात

आता वाटतं सुटावेत अलगद नकळत हात
जशी सहजच सुटे सुरगाठ, पण ती आहे निरगाठ

कसे विसरणार तिचा स्पर्श, तिचा गंध, पहिली मिठी
पावसात चिंब भिजलेली अन्‌ गाणी तिच्या ओठी

हसता हसता कधी आठवेलंच ना तिचा हसरा चेहरा
रडता रडता आठवेलंच ना अश्रूंनी भिजलेला खांदा

प्रत्येक क्षण तिच्याच नावावर, प्रत्येक श्वासात तिचाच उष्ण श्वास
हे क्षण परत कसे फेडू? हे श्वास परत कसे सोडू?

नाळ जेव्हा तुटते, नाते जेव्हा मिटते, तेव्हा काय वाटते?
मायेची अंथरलेली चादर फाटते

एका क्षणापूर्वी आपलं सर्वस्व असलेलं कुणी
दुसर्‍या क्षणी आपलं कुणीच उरत नाही

No comments: