जवळ आलेल्या प्रेम दिवसा निमित्ताने , पं. हरिवंशराय बच्चन यांच्या
आदर्श प्रेम या कवितेचा भावानुवाद इथे देतोय..
आदर्श प्रेम…
प्रेम कुणावरही करावे..
त्याला सांगावे का ?
स्वतःला वाहून द्यावे..
त्याला वाहून न्यावे का..?
गुणांचे चाहते बनावे परंतु
गाऊन ते ऐकवावे का ?
मनाचे खेळ सारे
त्याला भ्रमात घ्यावे का ?
सुगंध फ़ुलांचा घ्यावा ..
तोडून त्यास रुसवावे का ?
शुभेच्छांची फ़ुलं द्यावी..
अधिकार आपले ठसवावे का ?
क्षणात त्यागाच्या वाढते प्रेम..
त्यात स्वार्थ वसावा का ?
वाहून हृदय…हृदय मिळावे..
भाव व्यर्थ असावा का ?
No comments:
Post a Comment