Monday, September 20, 2010

रडता रडता डोळे माझे

रडता रडता डोळे माझे
झाले ओले चिंब
सकाळ सध्या आठवण येते
दुखून येते अंग ..!!

भान नाही कसले मला
मी तुला भेटण्या येते
दिसत नाही जेव्हा मला तू
मी सारे विसरून जाते ..!!

अश्याच संध्याकाळी येते
मनात तुझी आठवण
दिवस माझे कसेही जावोत
सुखी हो तुझा श्रावण ..!!

एक प्रार्थना देवा चरणी
करुण ही ना थकले
पुढल्या जन्मी तुलाच पावो
ह्या जन्मी जरी मी मुकले ..!!


No comments: