Tuesday, May 24, 2011

Faltu PJs

एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का?? . .. कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !! ---------------------


एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल? उत्तर : काय मग काय चाल्लय? ------------------------


मास्तर : बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव... बंड्या : उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!! ------------------------


दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात... प.झु.: काय 'बेगॉन' का...? दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!! ------------------------


अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो, चालुन चालुन खुपच दमतो, चालता चालता शेवटी एकदाची गुहा येते. तर तो काय म्हणेल? . आली बाबा !! ------------------------

लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्‍या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!! ------------------------

जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ????? . . अरे टॉम अँड जेरी सुरु होते ... ------------------------


एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात. रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.." तर त्या मांजरी काय म्हणतील??? " माऊ माऊ"!! ------------------------


TECHNOLOGY IMPACT: Baba aaplya mulala sangat asatat," Karatya tula kiti vela sangitale ahe ki tuza janma zala hota, tula konatyahi website warun download kele navhate." -----------------------

पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात .... दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत .... -----------------------


जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय? . अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते --------------------------


शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांचा काय उपयोग केला?? . राज्य करण्यासाठी?? . . नाही .. . . विचार करा.. . . सोप्पय ... . . कुलुप उघडण्यासाठी !!

No comments: