Wednesday, March 24, 2010

तुझ्या मिठीतले स्वप्न माझे

तुझ्या मिठीतले स्वप्न माझे
अजून तसेच डोळ्यात आहे
ओठांवरचे ओठ तसेच
अजून श्वास मोहक आहे

बरसले तुझे प्रेम असे
मन तसेच अजून चिंब चिंब
ओघळते दव ते चेहेर्यावरचे
मजा अजून त्याची आस आहे

सावरता मज सावरलीना
मिठी तुझी मज सोडवलीना
तिळ तुझ्या तो मानेवरचा
नजरेत तसाच टिपूर आहे

भूलविता किती ते भुलविणे कठीण
गुंतली नजर सुटणे कठीण
एक एक क्षण त्या घट्ट मिठीचा
रुपेरी माझे जीवन आहे

तुझ्या मिठीतले स्वप्न माझे
अजून तसेच डोळ्यात आहे

Monday, March 22, 2010

आहे माझं प्रेम तुझ्यावर

आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला “तशी” स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?
-Sachin Ghadegaonkar

Sunday, March 21, 2010

नाही स्पर्शिणे आकाश मला

नाही स्पर्शिणे आकाश मला
ना तोडणे तारे
इवलेसे एक स्वप्न आहे
तुझाच होऊन जगणे
याच स्वप्नात जगतो आहे
माझी स्वप्नपूर्ती हो
कासावीस हा जीव माझा
माझ्या तृश्नेची तृप्ती हो

क्षण क्षण सारखा विचार तुझा
त्यास थांबणेच नाही
थांबून त्यास मला प्रिये
तुज हरवायचे नाही
हरवून माझ्या प्रेमात तू
माझी प्रेमळ प्रीती हो
कासावीस हा जीव माझा
माझ्या तृश्नेची तृप्ती हो

श्वास हो माझा प्राण हो
अमोदिनी तू अनघा हो
घेवून हात हातात माझा
माझी जीवनधारा हो
हृदयात तू डोळ्यात तू
माझी निर्मल स्नेहा हो
कासावीस हा जीव माझा
माझ्या तृश्नेची तृप्ती हो

जीवन सुंदर लिहिणे आहे
अभिलाषा माझी अखिला हो
ह्या हृदयाच्या घरट्यात तू
माझी जीवन साथी हो
माझी प्रेरणा झालीस तू
आता माझी प्रतिभा हो
कासावीस हा जीव माझा
माझ्या तृश्नेची तृप्ती हो

Friday, March 19, 2010

आकर्षण आणि प्रेम..

आकर्षण आणि प्रेम..
यात एक रेघ असते..
पुसट की ठळक ...
ती आपण मारायची असते..

प्रेमाकडे जाणारा रस्ता
आकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...
पण त्या गहि-या मोहजालात
तुला तुझा मार्ग खरच का गवसेल??

आकर्षणाला प्रेम समजून
आपण उगीच वाहून जातो..
पण. थोड्याच दिवसान्नी कळत...
खरतर अस काहीच नव्हत..

म्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..
पण तो तर फ़क्त एक आभास असतो....

Thursday, March 18, 2010

असाव कुणीतरी.....तुज़्यामधे मी हरवले म्हणणारी.....

असाव कुणीतरी.....तुज़्यामधे मी हरवले म्हणणारी.....
असाव कुणीतरी.....
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी....
असाव कुणीतरी.....
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी.....
असाव कुणीतरी.....
मी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी.....
असाव कुणीतरी.....
माजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारी,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी.....
असाव कुणीतरी.....
भरलेच जर डोळे कधी माझे,
तर ओल्या आसवांना पुसणारी.....
असाव कुणीतरी.....
माज्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी.....
असाव कुणीतरी.....
पलिकडील किना-यावरून माझी वाट पाहणारी,
उशीर झाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ......
असाव कुणीतरी.....
असाव कुणीतरी.....तुज़्यामधे मी हरवले म्हणणारी.....