Wednesday, May 27, 2009

एक व्यथा आईच्या 'मना'तली, नि मनातल्या 'आई'ची...
"बालपण पाहायचं राहून गेलं................"


काय सांगू तुम्हाला, काहीतरी काळजात सलतय
माझ्या 'चिम्याचं' बालपण पाहायचं राहून गेलय...

नोकरीच्या व्यापत, त्याला घरीच होते सोडत
आणि मी बाहेर पडे, पण मनातून धडधडत...

इवल्याशा हातांच्या स्पर्शाला मन तडफडायचं
त्याच्या नजरेतील शोधला, होत न्हवत फसवयचं...

बोबडे बोल, मनापासून कौतुकने होते एकायचे
नि काळजावर कोरून, गॉदून होते ठेवायचे....

पहिली पावलं मालच पाहायची होती कौतुकने
नि घट्ट मिठी मारायची होती त्याला प्रेमाने....

क्षणोक्षणि, लाडाने भरवून, हट्ट पूरवायचे होते
लाडे लाडेच त्याला नखर्याने रागवायचेही होते..

'हे' नाही असे नाही, पण थोडेच वाट्याला होते
काळजातल्या 'आई'चे समाधान कुठे होत होते...

त्याने हात धरला की, बाहेर पाऊल पडत नसे
लेकरसाठी माय त्याची मना ने घरातच असे...

ही कथा एकटीची नाही, प्रत्येक काम करणार्‍या आईची
एक व्यथा आईच्या 'मना'तली,नि मनातल्या 'आई'ची...

No comments: