Monday, May 25, 2009

Some Jokes...

तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
----------------------------------------
---------------------------

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच.
त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं , '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना , जे तू पाहायला नको होतं ?''
त्यानं उत्तर दिलं , ''पाहिलं. ''
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''
'' आपले बाबा!!!! ''
.............................................

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
.............................

आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!! .....

No comments: