Tuesday, January 4, 2011

रात्र झाली,आठवण आली,

रात्र झाली,आठवण आली,
हलकेच डोळे टिपून गेली,
उदास आयुष्यात माझ्या,
हसायचे दोन क्षण देऊन गेली...

डोळे मिटताच ती दिसून आली,
काही क्षणाने ती भासू लागली,
आठवू लागले ते दिवस प्रेमाची,
अन, आज परत ती हवी हवीशी वाटू लागली..

पाहता पाहता वेळहि निघून गेली ,
अन आठवणींच्या विश्वात,
माझ्या आयुष्यातली, आजून एक रात सारून गेली...
अन आठवणींच्या विश्वात,
माझ्या आयुष्यातली, आजून एक रात सारून गेली...

No comments: