Friday, June 10, 2011

सहज एक दिवस

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का??

No comments: