Monday, August 1, 2011

विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे..

विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे..

तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत..

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही पोट पुरणपोळीच मागतं..

ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी मन मराठी चारोळीच मागतं..

मात्रुभूमि सोडली की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं..

भाषा सोडली की अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं..

वडाची झाडं मोठी होऊनही परत मात्रुभूमिकडे झुकतात..

कितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात..

काहीही बदललं तरी हृदय अजून मराठी आहे..

तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत..

स्पर्श तुज़ा भाव तुज़े, शब्द माज़ा नि नाव तुज़े..

इच्छा असून नाही म्हणतेस, निरालेच ग डाव तुज़े..

डोलयानी तर केव्हाच बोललिस, मग का, ओठांचे हे बनाव तुज़े..

मी प्रेमात वसवले नवीन विश्वा, घर माज़े, नि गाव तुज़े..

तुज़ी आठवण तुज़े स्वप्न, नि माज़या प्रत्येक श्वासाला नाव तुज़े..

मी मराठी आहे...

मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे..

धन्य हा महाराष्ट्र, लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू "पुण्याई"..

आपला महाराष्ट्र, आपली मराठी!!!!
शपथ घ्या, एकीने राहू, प्रगति करू, मराठी बोलू, मराठी टीकवू..!

No comments: