पुन्हा तेच घडतंय!!!!!!!!
तेच रामायण तेच महाभारत पुन्हा पुन्हा घडतंय
सितेच्याच नशिबात पुन्हा अग्निकुंड पडतंय
एका धोब्याच्या शंकेपायी सीतेन दिली अग्नीपरीक्षा
... अन पतीच्या खेळापायी द्रौपदीला वस्त्रहरणाची शिक्षा
रक्षण कर्त्या पतीनीच त्याकाळीही मान खाली केली
तिथेच मग दोघींच्याही स्वप्नांची होळी झाली
आजही तेच घडतंय ,देताहेत सीता अग्निपरीक्षा
घडत आहेत रोज वस्त्रहरण
या लोकशाहीच्या काळातही दोघीही
भोगत आहेत जिवंतपणी मरण
फरक इतकाच तेव्हा सीता होती आता गीता असेल
तेव्हा द्रौपदी तर आता एखादी आनंदी
पण अग्निपारीक्षाही तीच अन तीच
पुन्हा वस्त्रहरणाची नांदी
त्याकाळी एक बर होत रामायणात भरत,लक्ष्मण सारखे दीर
तर महाभारतात श्रीकृष्ण द्रौपदीच्या हाकेला धावलेला
पण आता हाक कोणाला मारायची ???????????
प्रत्येक राक्षसाने आता श्रीकृष्णाचा मुखवटा लावलेला
पुन्हा तेच घडतंय म्हटलंय कारण
धोबी, रावण, राक्षस गल्लोगल्ली जन्माला आले
पण रामायणातले भरत , लक्ष्मण अन महाभारतातल्या
श्रीकृष्णाचे दर्शन मात्र आजवर नाही झाले .,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

No comments:
Post a Comment