Sunday, January 8, 2017

एक राजा होता. त्याला चार राण्या होत्या..

एक राजा होता. त्याला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा? ☹☹☹☹☹

दुसरी राणी इतकी सुंदर होती कि तीला तो सतत जवळ घेऊन बसायचा!---

तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तीला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?---

चौथी राणीला तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!---
बरीच वर्षांनी राजा म्हातारा झाला,तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला,"मी तुला एवढे प्रेम लावले, तु माझ्या बरोबर येशील का?"

---

राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे .😳😳
राजाला अतिव दुखः झाले!!!!
मग त्याने दुसर्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,"मी तुमच्या बरोबर स्मशाना पर्यंत येईल त्यापुढे नाही !!!!!!!


---
राजाला अपारं दुखः झालं,त्याने आशेने तिसर्या राणीला विचारले,"तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ? "तिसरी राणी म्हणाली,"मी तुम्ही गेल्याबरोबर दुसर्या कुणातरी बरोबर जाणार तुमच्या जवळ रहाणार
 नाही."!!!!!

---
आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही.तो विचार करू लागला कि मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ? माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ,पैसा,आयुष्य खर्च केले?

---
तेवढ्यात!!!!!!!!!!!!!!!!!?
 राजाचीचौथी राणीतेथे आली,जीच्या कडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तीला अंगभर कपडे नव्हते कि, तीच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दाग-दागीने नहोते .

--- .  ती म्हणाली,"हे राजन् मी तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो कि स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असलातरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे !!!!!!!!!!!!!!?

---
राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्या-तून आनंदाश्रु वाहु लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राणत्यागं केला.
---

मित्रहो कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनहि तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला?

---
त्या उलट ती चौथी राणी!!!!! जीच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, कधीच काही बघीतले नाही,पण,तरीही तीने एवढा त्याग का केला?🤔🤔

खरंच कोण हा राजा? कोण ह्या राण्या? अोळखा पाहु?
---
--
     ठिक आहे मी सांगतो,मित्रांनो तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत???????????????
            नाही पटतं!!!!!!!!!!
ठिक आहे. बघा सांगतो,
1)आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो. नाही......का?
2)आपली दुसरी राणी स्मशाना पर्यंत आपल्याला सोडण्यास येते,ते आपली मुले, आप्तेष्ट,बंधु, मित्र थोड्क्यात समाज
3)आपली तिसरी राणी,जी आपल्याला सोडून दुसर्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा
आपल्या मृत्यु नंतर आपली संपत्ती लगेच दुसर्याची होते.
 . .  .  . . .  नाही का!!!!!!!?

4) आता आपली सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे . . . पुण्य जे आपणास आपल्या कर्माने मिळाली जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही
तरी पण जन्मो-जन्मी आपल्या बरोबर येतचं असते?

No comments: