*मास्तरच्या लेखणीतून एक दुःखद सत्य*
*विद्यालयाच्या जागेपायी*
*कुणीच इथं भांडलं नाही*
*अन्..देवालयाच्या जागेपायी*
*रक्त इथं आडलं नाही..*
*माझाच देव मोठा म्हणण्यात*
*रक्ताच्या नद्या वाहील्या*
*ज्ञानगंगा कोरडी पडत*
*ओसाड शाळा झाल्या...*
*शाळा अजुनही ओसाडच*
*पडक्या,तुटक्या भिंती*
*गरीब माझ्या देशामधी*
*उभी मंदिरं सोन्याची...*
*शाळेची इथल्या दानपेटी*
*कधीच भरली नाही*
*अन् मंदिराच्या* *दानपेटीला*
*ओझं सोसलं नाही...*
*शाळेतला पालक मेळावा*
*पालकांवाचून राहून गेला*
*देवालयात चेंगराचेंगरीत*
*माणुस तुडवून मेला...*
*विद्येचं ज्ञान देऊन*
*गुरूजी गरीबच राहीला*
*अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन*
*पुजारी धनवान झाला...*
*खरंतर धर्म नावाचं पुस्तक*
*शाळेत कधीच उघडत नाही*
*अन् धर्माच्या नावाशिवाय*
*देशात पानही हालत नाही...*
No comments:
Post a Comment