कधी तेजी तर कधी मंदी
शेअर बाजारात व्यवहार करणारे सर्वच असतात त्यातील छंदी
शेअर बाज़ार कसला हो ?
हा तर आहे सट्टा बाज़ार.
एकदा का कधी कुणाला जडला हा आजार
कळत नाही तो कधी होतो बेजार
सर्वस्व जरी लागले गमवावे
तरीही वाटते अजुन कमवावे.
कमावण्याच्या नादात त्यांचा होतो पोपट
तेव्हाच वाटतो हा मार्ग नव्हे सरधोपट.
मंदीच्या काळात प्यावी लगते कंट्री
तेजीत मात्र फिरून घेतो एंट्री.
अशी आहे शेअर बाजाराची किमया
भले भले फसतात इथे लीलया.
ठरवून शेअर बाज़ार सोडता येत नाही
एकदा दिलेली आर्डर खोड़ता येत नाही.
कमावण्याची प्रत्तेकला असते आस
तीच ठरते त्यांच्या गळ्याचा फास.
शेअर बाज़ार म्हणजे फक्त आसूं
जणू काही सूनेला वाटावी खाष्ट सासू.