तुझ्या श्वासांचे स्पंद ,
तुझी सारी सारी गीते,
तुझ्या स्वप्नान्तली ती, सारी सारी गं बेटे;
तुझ्या गळयातला तो धुन्द्कुंद मारवा,
तुझ्या अश्रुतहि तो भैराविचा गारवा,
तुझ्या शब्दात होते सारे सारे आकाश साठले,
एक मन तेवढे तुझ्या त्या डोळ्यांत दाटले...!
एक, शब्दांचा तेवढा नव्हता तो बहाना,
तुझ्या माझ्या नजरेला एक स्पर्श होता शहाणा;
कधी शब्द हे सखेगं, तुझ्या माझ्यात दाटले,
एवढे सारे आकाश असुनही, तुला थोड़े ते वाटले.
नको शब्दांचा सहारा,
नको ती सारी गीते.
एक तुझ्या माझ्या मधे सखेगं,
रीत ही नांदते.
No comments:
Post a Comment