Thursday, March 18, 2010

एकटाच नदी काठी बसायचो

एकटाच नदी काठी बसायचो
अजाण वारे अंगावर झोंबून जायचे
त्या वाहत्या पाण्याचा आवाज
जसा काही तरी सारख विचारायचा
कदाचित त्याला ओढ असायची काठाची
तिथे मी हि स्वतः ला विचारायचो
तू का इथे नाहीस ?
ज्या दगडावर मी पाण्यात पाय टाकून बसायचो
तिथे मला तू हवी होतीस

माहिती नाही पण नेमका
पौर्णिमेलाच मी तिथे पोहोचायचो
त्या चांदण्यात सगळं काही स्पष्ट असायचं
चंद्रच प्रतिबिंब हि आरशासारख दिसायचं
कविता लिहिताना सारखा वाटायचं
तू माझ्या खांद्यावर डोक ठेऊन माझे शब्द वाचतेस
आणि पुढे काय लिहीन ह्याची वात पाहतेस
पण तो माझा आनंदी भास असायचा
ह्याच वाईट वाटण्या आधीच
तिथे मला तू हवी होतीस

त्या संथ पाण्याचा आवाज
अजूनही माझ्या कानावर तसाच आहे
लिहिता लिहिता मी इतका तुझ्यात गुंतून जायचो कि
मला वाटायचा तू अगदी तिथेच आहेस
मी तुझ्याशी बोलायचो...तू हि बोलायचीस
आणि तुझ्या माझ्या गप्पां मध्ये सारी रात्र मजा लुटायची
खूप आनंदी असायचो सगळी दु:ख विसरायचो
तू हसत रहावीस म्हणून काय काय नाही करायचो
पण खरतर तू कधीच तिथे नव्हतीस
त्या प्रत्येक क्षणाच सुख वाटून घेण्यासाठी
तिथे मला तू हवी होतीस ...........

No comments: