Sunday, March 14, 2010

तुझ्या मिठीतले स्वप्न माझे

तुझ्या मिठीतले स्वप्न माझे
अजून तसेच डोळ्यात आहे
ओठांवरचे ओठ तसेच
अजून श्वास मोहक आहे

बरसले तुझे प्रेम असे
मन तसेच अजून चिंब चिंब
ओघळते दव ते चेहेर्यावरचे
मजा अजून त्याची आस आहे

सावरता मज सावरलीना
मिठी तुझी मज सोडवलीना
तिळ तुझ्या तो मानेवरचा
नजरेत तसाच टिपूर आहे

भूलविता किती ते भुलविणे कठीण
गुंतली नजर सुटणे कठीण
एक एक क्षण त्या घट्ट मिठीचा
रुपेरी माझे जीवन आहे

तुझ्या मिठीतले स्वप्न माझे
अजून तसेच डोळ्यात आहे

No comments: