Wednesday, November 17, 2010

जीवन - मृत्युचं चक्र अजीब

जीवन - मृत्युचं चक्र अजीब ,
टाळण नसतं हे कोणाचं नशीब,

चक्र सदा राहे सुरु,
वेळ बनून राहतो सगळ्यांचा गुरु,

जगण्याचा अर्थ कळतो जगून,
मरणाचा अर्थ बघावा शोधून,

मरण हे नसतं सोपं पचवणं,
आपल्या माणसाला जवळून हरवणं,

जीवनात येई अनेक चढ - उतार,
त्याने होई जगण्याचा उधार,

चक्रात अडकून राहतो प्रत्येक जण,
लीन होऊन जाण त्यात आहे शहाणपण

No comments: