Wednesday, November 17, 2010

मुक्याने दिवस जात आहे तरी

मुक्याने दिवस जात आहे तरी
राहते मी घरी एकटीच !!

दोन घोट पाणी पोटाला सहारा
अश्रु हा खारा ,लागतसे !!

करू हो कश्याला जिवाचे मी रान
वाटे समशान ,सारे काही !!

अनंताचे वेड नाही आता गळा
भरला हा डोळा , थेंब थेंब !!

मुके पण माझे दिसे हे जगाला
कुणी एक आला शोधावया !!

न लागे कश्याचा कुणा थांग पत्ता
माझी ही सत्ता ,मोडली मी !!

एक हातावर केला घाव आहे
त्यात रक्त वाहे ,सदोदित !!

नाव मी जपिन सदोदित त्याचे
मन नाही माझे .माझ्या मध्ये !!

निळ्या आकाश्याला पाहते कधी मी
बोलते कधी मी ,एकटीच !!

कसा तो असेल माझ्या विणा तिथे
वाहीन मी इथे , वेडी सर !!

तुझ्याच नावाने केला हा नवस
जातो हा दिवस ,कसा तरी!!

No comments: