Wednesday, November 17, 2010

तास झाला आता पुन्हा आठवण

तास झाला आता पुन्हा आठवण
मनी साठवण पुन्हा त्याची

उधारिचे जिने नको झाले बाई
देवा तुझ्या पायी ,मस्तक हे

दुक्ख तसे फार नाही माझ्या मना
आला तू जीवना ,त्या पासून

श्वास माझा बोले तुझे शब्द बोल
किती त्याचे मोल ,तुम्हा सांगू

माझे एक गाणे नेहमी बहाने
आपले तराने ,जीवनाचे

हसण्यात माझा ,दिवस हो जाई
तुझ्या पास राही ,तेव्हा कुठे

आता नाही तसे भासत हो मला
पुन्हा माझे जिणे ,एकटीचे

No comments: