Friday, November 26, 2010

Naaati..

शाळेतल्या दहा-बारा वर्षात काही चेहरे घर करून राहिले होते. एकचं माती अंगावर
बाळगून ते शाळेच्या मैदानात मळते होते.

कंठ फुटेस्तोवर भांडणं केली त्या चेहऱ्यांनी. आणि कंठ फुटण्याच्या वयातच तो
अचानक दाटून आला. डोळे पाणावले.

काळीज गदगदल. दहावीची परीक्षा संपायची वेळ आली. आणि आता पुन्हा ते दिसणार नाहीत
अस वाटू लागलं. शाळेच्या

मैदानातून शाळा अंधुक दिसू लागली. मग पुढचे काही दिवसही अंधुक होत राहिले.



कौलेजच्या पहिल्या काही दिवसांत त्यांच्याशी फोनाफोनी होत राहिली. पण जसे
त्यांच्या फोनचे नंबर बदलत गेले,

त्यांच्याशी जुळलेलं नातंही बदलत गेल. मागच्या आठवणींसारखच अंधुक झालं.

कौलेजात मग मैत्रीचं नवे ऋतूचक्र सुरु झालं. तोचं पावसाला, तोचं उन्हाळा आणि
तोचं मैत्रीचा उबदार हिवाळा. चेहरे मात्र नवे होते.



पण हे ऋतूही किती दिवस चालणार? मधेच दुष्काळालाही येण्याची लहर येतेच की!
कौलेज संपले, तसे ऋतूही संपले.

उरला तो फक्त नोकरीचा दुष्काळ. रोज तेच सकाळी उठणं, तेच तयार होणं, तिच बस,
तोचा डेस्क, तेच काम आणि तोचा कंटाळलेला मी.



पण नियतीही क्रूर असते. एखाद्याकडून त्याचं सर्वस्व परत घेण्यासाठी ती सर्व
काही देतच रहाते.

नोकरी करतानाही मैत्रीच्या झाडाला नवी पालवी फुटली.

पण आता मनात कायम एकचं भीती असते - 'पुढचा दुष्काळ कधी?'

आणि एकचं कुतूहल - ' दुष्काळानंतरच्या ऋतूंचा रंग कोणता?'



पुन्हा नवा वारा वाहतो

समोर नवा चेहरा येतो

जुन्या-खुज्या काळोखाआडून

नवा कवडसा उभा राहतो

सुकलेल्या खोडाला अलगद पालवी फुटते

आणि भूत - वर्तमानाची नाळ नकळत तुटते



नव्या वसंतात नवे मन जडू लागते

आणि ...

आणि मागचीच गोष्ट पुन्हा घडू लागते.

No comments: