Wednesday, November 17, 2010

जखमांचे दान दिले मी शरीरा

जखमांचे दान दिले मी शरीरा
विषाची मी मीरा ,कृष्ण माझा !!

एकटे जीवन ,एकटे मरण
सोबती येणार ,कृष्ण माझा !!

राधेचे आयुष्या होता एक राजा
त्याचा गाजा वाजा ,कृष्ण माझा !!

भासे निराकार आहे निराकार .
अनंताचा कार ,कृष्ण माझा !!

दुक्ख दूर करी सुख हा नान्दवी
सर्वांच्या जीवनी कृष्ण माझा !!

एकटे जीवन माझे पारायण
ऐक नारायण ,कृष्ण माझा !!

No comments: