Wednesday, October 13, 2010

या जगण्याला अर्थ मिळेना

या जगण्याला अर्थ मिळेना
या जगण्याचा अर्थ कळेना

शोधू कुठे मी तुला सजना रे
कळत नाही हे मजला रे ...
तू रिम झिमनारा पाऊस आहेस ...
हे मला उमजेना ...!!१!!
...या जगण्याला....

मनात माझ्या जागवलिस तू
प्रेमाची ही नवी भाषा तू
तू अक्कल बुधिमंत आहेस
मी बुद्धू हे समजेना ...!!२!!
...या जगण्याला....

हास्याने तुझे शब्द फुटेणा
जिवात माझ्या जिव जडेणा
प्रेमाची ही पाउल खून माझी
हृदयी तुझ्या उमटेणा ....!!३!!
...या जगण्याला....

जीवन गाणे पद्यासम वाटे
आयुष्य म्हणजे गुलाब काटे
कुंपणात मी राहून तरी ही तू
काटयासम मज तू वाटेना ...!!४!!
...या जगण्याला....

No comments: