आयुष्याचं गणित सारं
बदलून गेलं आहे
आयुष्यातून एक कोणी
वगळुन गेलं आहे
माती मध्ये रोवून सुद्धा
आभाळाला टेकले नाही
आभासाच्या दुनियेमध्ये
भास् समजुन भेटले नाही
सर्वी कड़े अंधार मला
रोज भेटून गेला
उन्हाळ्यातला पाउस तसा
मला रडवुन गेला ..
संतापाच्या लाटे मध्ये
मी हरवून जाते
पाण्या अभावी मासे पाहून
मी गहिवरून येते ..
शोधून सुद्धा सापडत नाही
खरं खुरं प्रेम ..
दुनियेपासून धावत असते
हाच माझा नित्य नेम ...
No comments:
Post a Comment