Wednesday, October 20, 2010

या कौलेजच्या कट्ट्यावर ...

त्या कौलेजच्या कट्ट्यावर
एकटाच बसलो होतो
समोरुन तु येताच तुझ्या
प्रेमात पडलो होतो

मग रोज रोज तुझी
वाट पहायची, मग
तु नाही दिसल्यावर मात्र
माझी नजर तुलाच शोधायची

गुलाबाचं लाल फुल देऊन
तुला प्रपोज केलं होतं
आयुष्यभर तुझी सोबतीण राहीन
असं वचन दिलं होतं

असं वचन तू तोडलसं
आणि मैत्रीही मोडलीस
प्रेमाच्या वाटेवर अशी
अर्ध्यावरच मला सोडलीस

तुझ्यी आठवणीतच
जगत बसेन जोपर्यंत
त्या कौलेजच्या कट्ट्यावर बसुन
वाट पाहीन तुझी
दुसरी भेटेपर्यंत ...!

No comments: