Monday, October 18, 2010

जसच्या तस काहीकाही राहत नाही

जसच्या तस काहीकाही राहत नाही

पण जसच्या तस काहीकही राहत नाही
थान्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

धपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटत
की आई जवळ हवी होती
अन दरवाज्यातल्या मोटारीपेक्षा वाटत
की जुनी सायकलच बरी होती
आदिदास असो वा रामदास असो आजीच्या हातच्या लोणच्यापुढे
सार काही दास आहे
त्याचीच आठवण येऊन आज
मन मात्र उदास आहे
आठवणीच्या ह्या सावल्यान्कडे मी आजकाल पाहत नाही
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

पुर्वी छत्री हरवली होती आता छत्रहि हरवल आहे
प्रेयसीला लिहीलेल पहीलवहील पत्रही हरवल आहे
पावसाच्या प्रत्येक थेम्बाप्रमाणे
तिची छबी नवी होती
नजर चुकवण्यासाठी का होईना
पण ती जवळ हवी होती
एरवी मुसळधार पावसात चिम्ब भिजणारा मी
आज पावसाच्या वाटेलाही जात नाही
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

काळ बदलला वेळ बदलली देश बदलला वेष बदलला
नाती बदलली माती बदलली तरीसुध्दा तरीसुध्दा
मन काही प्रवाहाबरोबर वाहत नाही
खरच....थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाह.

No comments: