Sunday, November 20, 2011

तुला पाहिले कि, कविता सुचते...
जशी तुझी नझर,
माझ्या काळजात घुसते...
शब्द आठवू लागतात,
मग त्या शब्दांच्या,
हळू हळू ओळी हि होतात...
अन,
त्या ओळीची,
रोज मी एक कविता रचते...

तुला पाहिले कि,कविता सुचते...
त्या सर्व दिवसांच्या,
जेव्हा जेव्हा मी तुला भेटते...
विसरून जाते रे सारे काही,
फक्त तुझ्याच असण्याने..
विसरून जाते कि मला पाय नाहीत,
विसरून जाते ते दुखं सारे ,
अन,
तुझ्याच बरोबर रोज मी,
हि स्वप्ना सारखी वाटणारी दुनिया फिरते...

तुला पाहिले कि,कविता सुचते...
का मलाच काळात नाही,
तुझ्या हसण्यावर, मी खूप मरते...
कधी तू दिसला नाहीस,
तर जीव खूप तळमळतो रे माझा,
अन,
तू नेहमी बरोबर असावास,
असं रोज मनी वाटते...

तुला पाहिले कि,कविता सुचते...
आपल्या ह्या जगा वेगळ्या प्रेमाची,
हा असा तू,
हि अशी मी,
अन,
हे असे आपले नाते,
शब्दानं पलीकडचे,
कोणालाच न कळणारे,
नितळ त्या भावनेने जुळलेले,
अन,
फुला सारखं फुललेले...

तुला पाहिले कि,कविता सुचते...
जगाला न दिसलेल्या,
न कळलेल्या...
आपल्या ह्या प्रेमाची...
म्हणून,
आपल्या ह्याच प्रेमासाठी,
आता,
रोज मी एक कविता करते...
रोज मी एक कविता करते...

ह्रषिकेश व्हटकर...

ह्या कवितेने कुणाच्या हि भावना दुखाव्याच्या नाहीत,
जर असे झाले असल्यास माफी असावी...

No comments: