छोट्या छोट्या गोष्टीतून
आयुष्य घडत असतं
अनेक आठवणींच्या मृगजळात
मन अडकून बसतं
क्षणभर विश्रांती चाचपताना
थोडीशी धाप लागते खरी...
पण... अनंताचा उगम शोधणाऱ्याला
मिळेल तरी कसा श्री हरी...??
सरळ साधा सोप्पा प्रश्न
सतत सतावत असतो
बऱ्याचदा पंचांग चाळूनही
ज्योतिष स्वतःचा भाग्योदय का चुकतो..??
देव म्हणजे नक्की असतं काय..??
स्वतः मधल्या विश्वासच मूर्त असं रूप
कि ....असं अजाणत कोडं
ज्याची उकल आहे कठीण खूप
फरक फरक तो काय म्हणायचा,
जाळण्यात आणि पुरण्यात
दोन्ही वेळी थांबतो तो श्वासच
ईश्वर तोलतो फक्त पाप आणि पुण्यात
माणूस म्हणून जन्मलो
त्यात काय मोठेपण
माणुसकी धरून वागलो
कमावले देवपण
हरिनामाच्या चिपळ्या बरोबर
स्वकर्तुत्वाचा गजर करायला हवं
ज्ञानेश्वरांनी ही भोगलं सार..
तिथे आपल्यालाही थोड धीर धरायला हवं
खड्डयात पडण काही गैर नव्हत
फक्त.... निर्धाराने फक्त उभं रहायची जिद्द हवी
रस्ता तर ठेचाळणारा असणारच
पण... पहिलं पाऊल टाकायची उमेद हरलेल्या मनात हवी
No comments:
Post a Comment