Thursday, February 2, 2012

इवल्याशा चिमुकल्या डोळ्यांनी

इवल्याशा चिमुकल्या डोळ्यांनी
छोटेसे जग पाहीले
जन्माला आल्या-आल्या प्रथम
माऊलीस माझ्या पाहीले

तीचेच बोट धरून मी
माझे पहिले पाऊल टाकले
तीच्याच शिकवनीतून मी पहिले
"आई" शब्द उच्चारले

मातृत्वाच्या संस्कारांचा
स्वाद किती गोड होता
आईच्या त्या हाकेमद्ये
आडला माझा श्वास होता

आज जेव्हा ठेच लागते
तेव्हा तूझीच आठवन येते
डोळ्यातले ते आश्रु पूसायला
पदर घेवून पूढे येते

तू नसताना काय सांगु
कुठे तूझी कमी भासते
जशी पावला पावलावरती
तूझीच आठवन मनी आसते

जेवताना आजूनही आठवतो
तू भरवलेला प्रत्येक घास
कसं सांगु आई भासतो
आजही तो भोकाडीचा भास

तूझ्याच डोळ्यांमद्ये मी
माझे सारे जग पाहीले
जन्माला आल्या-आल्या प्रथम
माऊलीस माझ्या पाहीले

No comments: