Saturday, February 4, 2012

घेऊन तिरडी खांद्यावरी मी चालीत आहे

घेऊन तिरडी खांद्यावरी मी चालीत आहे
माझीच चीता माझ्या कराने जाळीत आहे

आता पुन्हा का सोडावयाची कोडी वृथा ती
सारा तुझा डाव तू मांडलेला खेळीत आहे

दुनियाच झाली पुरती भिकारी वेड्या कली रे
संपृक्तता ती माझ्या सुखाची झोळीत आहे

खोटे उसासे खोटेच अश्रु अन् सांत्वने ती
लाथा किती ही मारा तुम्ही हो झेलीत आहे

वेड्या सख्या रे आलास तू ना थोडा उशीरा
दे आसवे ती नयनातली मी माळीत आहे

No comments: