Wednesday, February 8, 2012

खरच आयुष्य खुप सुंदर आहे

खरच आयुष्य खुप सुंदर आहे

सुर्य जेव्हा आकाशात
तळपत असतो रागाने
इवलस फुल सांगत त्याला
पहा पण जरा प्रेमाने

ढग जेव्हा दु:खी होतात
आणि बरसु लागतात धारा
ढगांच्या दु:खावर तेव्हा
फुंकर घालतो वारा

चंद्र एकटाच पडतो आकाशात
दर्दभरी गात गाणी
चांदण्या चमकत सोबत करतात
उत्सहाची भरुन वाणी

तान फुल, झाडं सारी
तुझ्याचसाठी गात आहेत
ओढे, नद्या, नाले, सागर
तुझ्याचसाठी वाहत आहेत

म्हणुनच तर सांगतोय ना ?

खरच pha dole ughdun
आयुष्य खुप सुंदर आहे

No comments: