Friday, February 10, 2012

इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं

इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं,
नजर लागायची भीती असते...
पाहुनी आज कळले मला
परमेश्वराची कलाकृती किती असते....

... सौंदर्याने तुझ्या.....आज तू....
शब्दांना हि निशब्द केलंस,
त्याच सौंदर्याला... आज तू....
सौंदर्याचं उदाहरण दिलंस.

तुझ्या डोळ्यात रात्रीची निरागस शांतता आहे,
तुझ्या हसण्यात एक"विलक्षण"शक्ती आहे,
उगाच नाही मिळत हे असं...त्यातही देवाची भक्ती आहे...
क्षितिजा पलीकडेही बरेचसे क्षितीज
अजूनही पाहणे माझे बाकी आहे..

No comments: