Sunday, February 12, 2012

येशील ना तेव्हा तुही.......राख माझी वेचण्यासाठी

येशील ना तेव्हा तुही.......राख माझी वेचण्यासाठी

ये......पुन्हा एकदा
माझ्या कवितांना विषय देण्यासाठी
ये......पुन्हा एकदा
माझ्या जगण्याला आशय देण्यासाठी

मिलनाची स्वप्नं बघतो मी
तुजविन तुकड्यांत जगतो मी
ये...मला एकसंध करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठी

उत्तरे न ज्यांची मजकडे
मन प्रश्न असे विचारू लागले
भावना घुसमटून गेल्या
शब्द आत गुदमरू लागले
ये...मला आझाद करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठी

कविता माझ्या रडू लागल्या
भावनांना मरण आलं
आगीत तुझ्या विरहाच्या
सारं काही जळून खाक झालं

जमतील सारे जेव्हा
चिता माझी रचण्यासाठी
येशील ना तेव्हा तुही
राख माझी वेचण्यासाठी

राख माझी वेचताना
जर तुला का रडू आलं
तर दोन थेंब तुझ्या अश्रूंचे
माझ्या राखेवरती गळू देत
मरण माझं वाया गेलं नाही
हे मलासुद्धा कळू देत ,

No comments: