Saturday, February 11, 2012

शब्द.....

बोलताना जरा सांभाळून, शब्दाला तलवारी पेक्षा धार असते..
फरक फक्त एवढाच कि,
तलवारीने मान तर शब्दाने मन कापले जाते..
जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दाच्या जखमेतून अश्रू येत असतील तरी...
दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखीच असते...
शब्दच माणसाला जोडतात, आणि शब्दच माणसाला तोडतात..
हे शब्दच आहेत, ते कधी रामायण तर कधी महाभारत रचतात,
तुझ्या एका शब्दावर माझे हसणे, तर तुझ्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून आहे...
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून, शब्दाला तलवारी पेक्षा धार असते..

Spoken words will never come back,, So think twice before u take major decisions in life, specially in love BCoz "तुझ्या एका शब्दावर माझे हसणे, तर तुझ्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून आहे...

No comments: