Wednesday, February 29, 2012

शब्दांना जोडून शब्द

कागदावर गोळा झाले सये
तुझ्या सहवासातील क्षण
अवतरतात शब्द मग ओले
कोरडे होते आपोआप मन

*******************

शब्दांना जोडून शब्द,
आज मी हि कविता केली...
शब्दांच्या ऐवजी ओळीं मध्ये,
भावनांची मी आरास रचली ...
तुला पाहून गोठलेल्या,
त्या शब्दांना माझ्या,
मी ह्या कवितेतून वाट दिली...
अन जे कधी हि न सांगू शकलो तुला,
तेच सगळ सांगण्यासाठी,
आज मी हि कविता लिहीली...
तेच सगळ सांगण्यासाठी,
आज मी हि कविता लिहीली...

No comments: