Monday, February 27, 2012

तुला पाहील कि अस वाटत

तुला पाहील कि अस वाटत,
फक्त तुलाच पाहत बसाव...
तुझ्यातच माझ विश्व शोधाव,
अन शोधता शोधता,तुझ्यातच हरवून जाव...

तू बोलत असलीस कि अस वाटत,
तू फक्त बोलतच रहाव,
अन मी फक्त ऐकतच रहाव,
आपल हे बोलन, कधी हि न संपाव...

तू उदास झालीस कि अस वाटत,
तुला हसवण्यासाठी मी काहीही कराव...
बागेत तुझ्या बरोबर फिरताना,
फक्त तुला हसवण्यासाठी,
मी मुद्दामूनच धडपडाव...
अन लागलं म्हणून,
मी खोट खोट तुझ्या पुढे रडाव ...

मग माझा खोटेपणा कळताच,
तू माझ्यावर मुद्दामून रुसाव,
मी तुला मन्वण्याचा प्रयत्न करताच ,
गालातल्या गालात तू हळूच हसाव,
अन मी घेता तुझा हात माझ्या हातात,
तू हलकेच लाजाव...

तू हसू लागलीस कि अस वाटत,
एखाद गुलाबच फुल फुलाव,
पाहून तुला हसताना,
मी हि खूप खूप हसाव...

तू बरोबर असलीस कि अस वाटत,
दिवस संपूच नये कधी,
अन आपण बरोबरच रहाव,
फक्त तू अन मी,
आजून कोणीच नसाव...
आजून कोणीच नसाव...

No comments: