Sunday, February 5, 2012

खेळ-मी खेळ मांडियला होता

मी खेळ मांडियला होता
परि मिळाले भिडू उफराटे
ते खेळ खेळण्या आधी
मला मागतात बक्षिसांचे वाटे

तरीही मी खेळतच राहिलो
करीतच आपल्या वाट्याची पदरमोड
परंतू आता त्यांना हो
खेळांचे नियमच वाटतात ढोंग

मुळी विश्वासच नाही त्यांचा खेळावरी
सारेच ठग अन पेंढारी
किती बदलावी मैदाने, किती बदलावे भिडू
साली सारी जातच चोर, तर आणावे कुठून खेळाडू थोर

मग मी संतापतो, मनात ही हिंसा दाटे
शब्दाच्या एकल दुधारिने... कापीत जातो अनेक शेते
मग टाहो टाहो होतो, मज मारेकरी म्हणती
मज फाशी देण्यावर, मात्र त्यांची एक सहमती

मला आता उगीच वाटते.... मी डाव रडीचा केला
वांझाटाच्या वस्तीमध्ये, .....स्टाल खेळणीचा लाविला

No comments: