Monday, January 2, 2012

गजरा

दव बिंदूत भावना…
माझ्या सारखीच तुला असावी,
हे काय जरुरी आहे?,

खरंच,प्रेमात…
वाट पहावी लागणं,
हि उच्चांकाची सबुरी आहे,

मोहरलेल्या अंतरंगानं…
घरट्यात पाऊल वळावं,
खरं का हि प्रितीच आहे?,

मन जरी शेवाळलं असलं,
तरी पायाखाली…
सरकणारी रेतीच आहे,

सांगितलेलं काम विसरलो,
जाऊ दे गं…
मी तसाच आहे,

मुठी आणलेला गजरा….
कोमेजला जरी,तरी..
हाती सुवास तसाच आहे...!!!

No comments: