Tuesday, January 17, 2012

तुला बघताच माझे हाल काय झाले

तुला बघताच माझे हाल काय झाले
होते नव्हते जे ते ते घडून आले

अचानक मन डोहा समोरी आले
डोळे बघताच सरोवर खुळे झाले

असे रोखुन बघु नको तू मला
वादळ काजळात उतरून आले

धनुष भुवईचे ताणून आले
बाण अचुक काळजात चाले

तुझे इशारे ते बघ काय झाले
अर्थ बघताच शब्दाचे भान वाळे

परीचा उमाळा ढग गाली ते आले
कोसळे पाऊस सरी कसे सांभाळू बरे

पडझड माझी होते हळूहळू गडे
बुटी देणारे तुझे रूप ठेले

उमलले पापण्यात मधु पेले
होते नव्हते जे ते ते घडून आले

No comments: