Sunday, January 1, 2012

तू माझी नसलीस तरी माझी आहेस !

तू माझी नसलीस तरी माझी आहेस !
अळवा वरच्या थेम्बा सारखी
डोळ्यातल्या अश्रूंसारखी
ओघळत नाहीत....
तोपर्यंतच....

तू माझी नसलीस तरी माझी आहेस !
तुफानी वादळासारखी
बरसणाऱ्या सरींसारखी
थांबत नाहीत....
तोपर्यंतच....

तू माझी नसलीस तरी माझी आहेस !
उगवणाऱ्या पहाटेसारखी
मावळणाऱ्या संध्येसारखी
मिटत नाहीत....
तोपर्यंतच.....

तू माझी नसलीस तरी माझी आहेस !
धडधडणाऱ्या हृदयासारखी
कवितेमधल्या शब्दांसारखी....
थांबले....तरीही.....तू....माझीच....माझीच.....माझीच.....

No comments: